सूस :
प्रभाग क्रमांक ९ मध्ये क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी सातत्याने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेणारा बीबीएसएमतर्फे आयोजित खेळाडू स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात प्रभागातील क्रीडा विकास, भविष्यातील क्रीडा धोरणे तसेच खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या दूरदृष्टीपूर्ण क्रीडा धोरणामुळे क्रीडांगणे, मैदाने आणि विविध क्रीडा स्पर्धांना सातत्याने चालना मिळत असून, याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर आणि सहभागावर होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यामुळे प्रभागातील खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्नेहमेळाव्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत सहउमेदवार सौ. गायत्री मेढे–कोकाटे, सौ. पार्वती निम्हण, श्री. अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे यांचीही उपस्थिती लाभली.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये राबवण्यात आलेल्या क्रीडा धोरणाबाबत समाधान व्यक्त करत उपस्थित सोसायटी खेळाडूंनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला. येत्या १५ जानेवारी रोजी घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून पक्षाच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा ठाम संकल्प यावेळी खेळाडूंनी व्यक्त केला.
हा स्नेहमेळावा क्रीडा क्षेत्रातील ऐक्य, संवाद आणि विकासाचा ठोस संदेश देणारा ठरला.





























More Stories
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम
*”‘मोठी स्वप्ने पाहा… भारत घडवा!’ — भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा बावधन येथील पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांपर्यंत !!!!*