औंध :
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत औंध–बोपोडी प्रभागातील औंध येथे औंध रोड सोसायटी असोसिएशन, एम.एम. हॉटेल व परिसरातील नागरिकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून भाजपा अधिकृत उमेदवार श्री. सनी निम्हण यांना नागरिकांशी पुन्हा एकदा थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
या बैठकीस औंध–बोपोडी प्रभागातील सर्व सहकारी उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच एकूणच विकासाबाबतच्या आपल्या अपेक्षा व संकल्पना मनमोकळेपणाने मांडल्या.
नागरिकांच्या सूचनांचे गांभीर्याने स्वागत करत, उपस्थित मान्यवरांनी Accountable आणि time-bound पद्धतीने विकासकामे पूर्ण करण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. नागरिकांच्या अपेक्षांना प्राधान्य देत, प्रभागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या संवादातून नागरिकांचा वाढता विश्वास आणि विकासासाठीची सकारात्मक ऊर्जा पुन्हा एकदा दिसून आली.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!