बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार जयेश मुरकुटे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये उपस्थित राहून भव्य पदयात्रेत सहभाग घेतला. या पदयात्रेला परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
पदयात्रेदरम्यान रोहित पवार यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत जयेश मुरकुटे यांच्या कार्याची, शिक्षणाची आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाची माहिती दिली. जयेश मुरकुटे हे उच्चशिक्षित, सुशिक्षित तरुण नेतृत्व असून प्रभागातील मूलभूत प्रश्नांची जाण असलेले उमेदवार आहेत, असे सांगत नागरिकांनी त्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. जयेश मुरकुटे यांच्यासारखा तरुण आणि उच्चशिक्षित उमेदवार प्रभागाला नवी दिशा देऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.”
पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी जयेश मुरकुटे यांना विकासाच्या मुद्द्यांवर पाठिंबा दर्शवत सकारात्मक प्रतिसाद दिला. या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक वातावरण अधिक तापले असून जयेश मुरकुटे यांच्या प्रचाराला नवे बळ मिळाले आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!