सोमेश्वरवाडी :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील सोमेश्वर वाडी येथे महाविकास आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. जीवन चाकणकर यांनी गावभेट दौरा व पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पदयात्रेदरम्यान श्री. चाकणकर यांनी घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या, अपेक्षा व सूचनांचा आढावा घेतला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांना त्यांनी तत्काळ दखल घेत, प्राधान्याने सोडविण्याचा ठाम विश्वास दिला.
“लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि विकासाचा विश्वास निर्माण करणे, हेच माझे ध्येय आहे,” असे सांगत त्यांनी समावेशक व विकासाभिमुख कामकाजाचा आराखडा मांडला. स्थानिक तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पदयात्रेला उत्साहात पाठिंबा दिला.
सोमेश्वर वाडीतील ही पदयात्रा केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता, लोकशक्तीचा उत्सव ठरली. जनतेच्या सहभागातून परिवर्तनाचा संदेश देणारी ही पदयात्रा आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी