March 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

महाळुंगे येथील जनता युवा उमेदवार जयेश मुरकुटे यांच्या पाठीशी !!

महाळुंगे :

पुणे महानगरपालिका हद्दीत नव्यानेच आलेल्या महाळुंगे परिसरातील जनता प्रभाग क्र 9 चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सुशिक्षित आणि युवा उमेदवार जयेश मुरकुटे यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे दिसून येत आहे. काल जयेश मुरकुटे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेस येथील जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. यावेळी महाळुंगे गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने पदयात्रेस उपस्थित होत्या. उमेदवाराचे अनेक ठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले.

महाळुंगेतील रस्त्यांची झालेली दुरावस्था, कचऱ्याचा प्रश्न, पाणीटंचाई आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या रस्त्यात गेलेल्या जागेचा मोबदल्याचा प्रश्न अशा अनेक विषयांनी त्रस्त असलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना आवाज म्हणून जयेश मुरकुटे यांनी काही महिन्यांपूर्वीच ‘आक्रोश निषेध आंदोलन’ नावाने जनआंदोलन उभारले होते.

हायटेक सिटीच्या नावाखाली 2017 पासून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप यावेळी केला होता. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली होती सोसायट्यांमधील नागरिक व शेतकरी पहिल्यांदाच या आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते

झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि नागरिकांचा शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी पोट खिडकीने आपल्या समस्या मांडल्या.
म्हाळुंगे टाऊन प्लॅनिंग योजनेत झालेला प्रचंड भ्रष्टाचार, बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीची अडवणूक, पीएमसी पीएमआरडीए यांच्यात नसलेला ताळमेळ, मूलभूत सुविधांचा अभाव त्याचप्रमाणे रस्त्याची दुरावस्था, कचरा, डीपी प्लॅन, ट्रॅफिक याबद्दल तक्रारींचा पाढा वाचत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता.

याचाच परिणाम म्हणून प्रभाग क्रमांक 9 चा भाग असलेल्या आणि नव्यानेच महापालिका हद्दीत समावेश झालेल्या महाळुंगेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवा आणि सुशिक्षित उमेदवार असलेल्या जयेश मुरकुटे यांना भक्कम पाठिंबा दिला असल्याचे दिसून येत आहे.

सगळ्या पुण्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग 9 ची लढत आता निर्णायक टप्प्यावर आली असून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार जयेश मुरकुटे यांच्यामुळे ही लढत अजूनच रंगतदार झाली आहे. नियोजनबद्ध प्रचार, आधुनिक प्रचार पद्धती, सुशिक्षित नोकरदार वर्गाचा वाढता पाठिंबा यामुळे जयेश मुरकुटे यांची बाजू अधिक भक्कम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी तसेच अपक्ष असलेल्या मातब्बर नेत्यांना बरेच प्रयत्न करावे लागणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे.