महाळुंगे :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील महाळुंगे येथे भाजपा अधिकृत उमेदवार गणेश कळमकर यांच्या प्रचारार्थ आज भव्य पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या पदयात्रेत स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पदयात्रेदरम्यान उमेदवार गणेश कळमकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील विविध समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपली मते मांडली. नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा जनतेचा वाढता विश्वास आणि मजबूत पाठिंबा दर्शवणारा ठरला.
यावेळी आगामी निवडणुकीत “कमळ” या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामांच्या जोरावर सुसगाव परिसरात भाजपाच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!