बाणेर :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मधील महिला मतदारांचा वाढता पाठिंबा भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. गणेश कळमकर यांना मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परिसरातील लाडक्या बहिणींनी दाखवलेला विश्वास व प्रेमळ आशीर्वाद हे केवळ राजकीय पाठबळ नसून, माझ्या कार्याची खरी प्रेरणा असल्याचे मत गणेश कळमकर यांनी व्यक्त केले.
प्रभाग ०९ मधील महिलांचा मिळणारा पाठिंबा ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी असून, त्यांच्या विश्वासावर खरा उतरायचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अधिक प्रामाणिकपणे आणि अधिक ताकदीने काम करण्याची ऊर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षितता, सन्मान, आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
“लाडक्या बहिणींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास कायम ठेवणे आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय देणे हेच माझे खरे ध्येय आहे,” असे ठाम मत गणेश कळमकर यांनी व्यक्त केले. महिलांच्या सहभागामुळे प्रभागातील प्रचाराला सकारात्मक दिशा मिळत असून, भाजपाच्या उमेदवाराला मोठे बळ मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे.




























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम