महाळुंगे :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ च्या प्रचारार्थ म्हाळुंगे येथे आयोजित करण्यात आलेली भव्य पदयात्रा आज प्रचंड उत्साह, जल्लोष आणि जनसहभागाच्या वातावरणात पार पडली. पाण्याची टाकी–सुवर्ण गणेश मंदिर येथून “विकास, विश्वास आणि संवाद” या संकल्पनेवर आधारित या पदयात्रेचा शुभारंभ झाला.
पदयात्रेच्या संपूर्ण मार्गावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. फुलांचा वर्षाव, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे म्हाळुंगे परिसर अक्षरशः भारावून गेला होता. ही पदयात्रा केवळ प्रचाराची नव्हे, तर जनतेशी थेट संवाद साधणारी आणि लोकभावनांचे प्रतिबिंब उमटवणारी ठरली.
या दरम्यान सूर्यमुखी मंदिर, समाज मंदिर, लक्ष्मी माता मंदिर, कातुरजाई मंदिर, हनुमान विठ्ठल मंदिर, भैरवनाथ मंदिर, राम मंदिर, चिव्हे आळी गणेश मंदिर, दत्त मंदिर अशा विविध धार्मिक व सामाजिक स्थळांना भेट देत पदयात्रा पुढे सरकत राहिली. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी मनापासून स्वागत करत विकासासाठीचा विश्वास व्यक्त केला.
म्हाळुंगे गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, ग्रामस्थ तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने ही पदयात्रा लोकशक्तीचे प्रभावी दर्शन घडवणारी ठरली.
या भव्य पदयात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक, म्हाळुंगे येथे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री मेढे–कोकाटे, कु. पार्वती निम्हण, श्री. अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे आणि पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाद्यक्ष उपस्थित होते. याप्रसंगी येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!