बाणेर :
भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलच्या सरचिटणीस वैशाली कमाजदार यांनी अमोल बालवडकर यांच्यावरील अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेत, माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
त्यांच्या कार्यपद्धती, जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ वैशाली कमाजदार यांची पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यदक्ष पदावर नेमणूक केली. या नेमणुकीमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे संघटनात्मक बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आपले कर्तृत्व, प्रामाणिकपणा, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांच्या जोरावर हा पदभार मिळाल्याचे वैशाली कमाजदार यांनी सांगितले. महिलांच्या प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशीलता, सातत्यपूर्ण कार्यशैली आणि प्रभावी संघटन कौशल्य पक्षसंघटन अधिक मजबूत करेल, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.


More Stories
पुणेमहानगर पालिका हद्दीत‘अपघातग्रस्त नागरिक सहाय्यता धोरण’ राबवावे, नगरसेवक अमोल बालवडकरांचा स्थायी समितीकडे प्रस्ताव…
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*