बालेवाडी :
प्रभाग क्रमांक ९ मधील बालेवाडी परिसरात परिवर्तनाची हाक देत काल एका उमेदवाराच्या प्रचारार्थ भव्य आणि उत्स्फूर्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेला स्थानिक रहिवाशी, सहकारी मित्र, कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
“आता वेळ परिवर्तन घडवण्याची” या संदेशासह काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आगामी निवडणुकीत बदलाची भूमिका स्पष्ट केली. बालेवाडीतील नागरिकांमध्ये प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विकासाभिमुख, तरुण आणि सुशिक्षित लोकप्रतिनिधीची गरज असल्याचा ठाम मतप्रवाह यावेळी दिसून आला.
पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. स्थानिक प्रश्न, विकासाच्या अपेक्षा तसेच भविष्यातील नियोजन यावर सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांनी उमेदवाराला भरभरून पाठिंबा देत परिवर्तनाच्या या लढाईत कायम साथ देण्याचा विश्वास व्यक्त केला.
नागरिकांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासासाठी निश्चितच परिवर्तन घडवून आणले जाईल, असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!