पाषाण :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. जीवन चाकणकर यांनी पाषाण गावात गावभेट दौरा व भव्य पदयात्रेचे आयोजन केले. या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
पदयात्रेदरम्यान श्री. चाकणकर यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांबाबत नागरिकांनी आपली मते व अपेक्षा मांडल्या. स्थानिक समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत सर्व प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“जनतेच्या विश्वासावर विकासाची नवी दिशा देणे हेच माझे ध्येय आहे. पाषाण गावासह संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे आश्वासन श्री. जीवन चाकणकर यांनी यावेळी दिले.
या गावभेट दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा निर्माण झाली असून महाविकास आघाडीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी