बाणेर :
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने (११ ते १७ जानेवारी) बाणेर वाहतूक विभाग, पुणे शहर यांच्या वतीने बाणेर रोडवरील सायकर चौक येथे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत दुचाकीस्वार तसेच इतर वाहनचालकांना सिग्नलवर थांबवून गुलाबपुष्प देत वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या वेळी बाणेर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद डोंगरे यांच्यासह अंमलदार संदेश दापकेकर, अनिल माने, राम जाधव, निलेश बेडके, सागर बाबरे तसेच वॉर्डन नवनाथ यादगिरे व मुस्तफा चाऊस उपस्थित होते.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रशिक्षित करण्याची आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची महत्त्वाची संधी आहे. याच उद्देशाने या अभियानात नागरिकांना विनाकारण हॉर्न न वाजवणे, सिग्नलचे नियम पाळणे, हेल्मेट घालूनच वाहन चालवणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, मद्यपान करून वाहन न चालवणे तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
“डोकं वाचलं तर जीव वाचतो” हा संदेश देत वाहतूक नियम पाळल्यासच अपघातांना प्रतिबंध घालता येईल आणि नागरिकांची सुरक्षितता वाढेल, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या जनजागृतीमुळे वाहनचालकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला असून, रस्ते सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने जबाबदारीने व सावधपणे वाहन चालवावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी