पुणे :
देशातील पहिली मुलींची शाळा असलेल्या पुण्यातील भिडेवाडा येथे आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत २ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला चार दिवसीय भव्य दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल – पुणे २०२६ अत्यंत उत्साहात पार पडला.
फुलेप्रेमी व संविधानदूत विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या फेस्टिव्हलला देशातील किमान दहा राज्यांतील तसेच परदेशातील शेकडो फुलेप्रेमी कवी-कवयित्रींची उपस्थिती लाभली. सामाजिक प्रबोधन, स्त्रीशिक्षण, समता आणि संविधान मूल्यांचा जागर करणारा हा महोत्सव ठरला.
२ जानेवारी रोजी भारतीय संविधानाला अभिवादन करत अत्यंत भव्य, दिव्य व नयनरम्य उद्घाटन सोहळ्याने फेस्टिव्हलची सुरुवात झाली. ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एकाच रंगाच्या साडीत सावित्रीआईंच्या वेशात शेकडो कवयित्रींच्या उपस्थितीत जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक व प्रेरणादायी दृश्याने उपस्थितांचे डोळे अक्षरशः भरून आले.
या फेस्टिव्हलमध्ये पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका सौ. मीना सुधीर खडतरे यांनी “पेटली क्रांतीची ज्योत” हे प्रभावी काव्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सशक्त आशय, प्रभावी मांडणी व भावस्पर्शी सादरीकरणाची दखल घेत त्यांना अध्यक्षपदाचा सन्मान देण्यात आला.
सन्मानप्रसंगी सौ. मीना खडतरे यांना संविधान ग्रंथ, सन्मानचिन्ह, शेला, संविधान लेखन पॅड तसेच हिरवी साडी देऊन गौरविण्यात आले.
चारही दिवस सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत काव्य महोत्सवाची विविध सत्रे पार पडली. दररोज किमान दहा लॉट्समध्ये शंभरहून अधिक कवी-कवयित्रींनी आपली काव्य सादरीकरणे केली. फुले विचारांचा जागर करणारा हा फेस्टिव्हल उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.





More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!