बाणेर :
प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार जयेश मुरकुटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बाणेर भैरवनाथ मंदिरात विधिवत पूजन व आशीर्वाद घेऊन मोठ्या उत्साहात करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील रहिवासी, सहकारी मित्र, पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचार शुभारंभाच्या वेळी उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विकासाभिमुख, तरुण आणि सुशिक्षित नेतृत्वाची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम व जनतेशी थेट संवाद साधणारा लोकप्रतिनिधी आवश्यक असल्याचे मत यावेळी अनेकांनी मांडले.
जयेश मुरकुटे यांनी उपस्थितांचे आभार मानत सांगितले की, प्रभागातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे, स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा तसेच युवक व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्यात येईल. नागरिकांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने परिवर्तनाची ही लढाई निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“परिवर्तन घडवूया, जयेश निवडूया” या घोषवाक्यासह प्रचाराचा हा शुभारंभ प्रभाग क्रमांक ९ मध्ये नव्या आशा आणि अपेक्षांना बळ देणारा ठरला आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!