सोमेश्वरवाडी :
भाजप कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाचे सरचिटणीस सचिन दळवी यांच्या सोमेश्वरवाडी येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दळवी कुटुंबीयांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन दळवी यांच्या पत्नी लक्ष्मी सचिन दळवी या सर्वसाधारण महिला गटातून इच्छुक उमेदवार होत्या. मात्र मार्गदर्शक नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार त्यांनी सर्वसाधारण महिला गटासाठी भरलेला अपक्ष अर्ज मागे घेत, पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
या निर्णयाच्या अनुषंगाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दळवी यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सचिन दळवी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाचे सरचिटणीस म्हणून संघटनात्मक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची विशेष दखल घेतली.
“सचिन दळवी यांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा उपयोग करून येत्या काळात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य संधी निश्चितपणे देण्यात येईल,” असे आश्वासन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
या भेटीमुळे पक्षातील शिस्त, नेतृत्वावरचा विश्वास आणि संघटनात्मक बळ अधिक दृढ झाले असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. यावेळी सचिन दळवी मित्र परिवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी