औंध :
महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठमध्ये औंध येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्ती व विधाते वस्ती येथे माजी नगरसेवक व भाजपाचे अधिकृत उमेदवार सनी निम्हण यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा व विकासाबाबतच्या सूचना त्यांनी जाणून घेतल्या.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करत, त्यांच्या समता, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांवर आधारित विकास घडवण्याचा संकल्प सनी निम्हण यांनी व्यक्त केला. “डॉ. बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावरूनच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करत, पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षिततेसह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. नागरिकांच्या अपेक्षा आणि मनातील विकासाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, असा विश्वासही सनी निम्हण यांनी व्यक्त केला.
या संवादामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, थेट संवादातून लोकांच्या प्रश्नांना वाचा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी