औंध :
औंध परिसरातील राम-लक्ष्मण उद्यान, आनंदमन क्लब, सानेवाडी ग्राउंड, मारूतराव गायकवाड उद्यान तसेच इंदिरा गांधी विद्यालयाच्या पटांगणात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी प्रभाग क्रमांक ८ (औंध–बोपोडी) येथील भाजपा अधिकृत उमेदवार सनी निम्हण यांनी मनमोकळा संवाद साधला. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा व विकासविषयक मुद्दे त्यांनी प्रत्यक्ष ऐकून घेतले.
यावेळी जवळच असलेल्या मैदानावर काही तरुण मित्र क्रिकेट खेळताना दिसले. “स्पोर्ट्स म्हटलं की माझा जीव की प्राण,” असे सांगत प्रचाराच्या प्रचंड धावपळीतूनही सनी निम्हण यांनी क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. तरुण मित्रांसोबत मैदानात उतरून त्यांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतला.
या प्रसंगामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राजकारणाबरोबरच क्रीडा व तरुणाईशी असलेले स्नेहबंध अधिक दृढ झाले असून, सनी निम्हण यांचा हा आपुलकीचा आणि ऊर्जादायी सहभाग नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देणारा ठरला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी