बालेवाडी :
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज बालेवाडी गावठाण परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीला ग्रामस्थांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रचार फेरीची सुरुवात बालेवाडीतील श्री भैरवनाथ मंदिर व इतर मंदिरांमध्ये दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांनी गावठाणातील घरा-घरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रत्येक घरातून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून नागरिकांनी आपुलकीने उमेदवारांचे स्वागत केले.बालेवाडी गावठाण आणि भीमनगर परिसरात नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
कुठे औक्षण, कुठे आशीर्वाद तर कुठे फुलांचा वर्षाव करत नागरिकांनी उमेदवारांवर विश्वास व्यक्त केला. अनेक नागरिकांनी मिठी मारून “तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे ठामपणे सांगितल्याने प्रचार फेरीदरम्यान वातावरण भावनिक झाले होते.
या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक ९ मधील अधिकृत उमेदवार —
गायत्री मेढे–कोकाटे (अ गट), बाबुराव चांदेरे (ब गट), पार्वती निम्हण (क गट) आणि अमोल बालवडकर (ड गट) सहभागी झाले होते. सर्व उमेदवारांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळाला. यावेळी राहुल दादा बालवडकर यांनी उपस्थित राहून राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अधिकृत चारही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी उमेदवार अमोल बालवडकर म्हणाले, “नागरिकांनी दिलेला विश्वास, आशीर्वाद आणि प्रेम हीच आमची खरी ताकद आहे. या बळावर प्रभाग क्रमांक ९ चा विकास अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार आम्ही केला आहे.”
प्रचार फेरीदरम्यान बालेवाडी परिसरातील विविध ठिकाणी फुलांचा वर्षाव करत उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. नागरिकांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रचार फेरीला मोठे यश मिळाले.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन