September 19, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

ऑल स्टाइल कराटे कॅम्प स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचा अंकित अतुल शेडगे येलो बेल्टचा मानकरी

बावधन :

सह्याद्री मार्शल आर्ट असोसिएशन कराटे स्पर्धा दिनांक २९/१२/२०२५ आणि ३०/१२/२०२५ अलीकडे मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट येथील विद्याथी कु. अंकित अतुल शेडगे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सह्याद्री मार्शल आर्ट ट्रेनिंग कॅम्प येथील मुळशी तालुका क्रिडा संकुल ,भरे कराटे मध्ये येलो बेल्टचा पटकावला. म्हणून त्यांला सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.

अंकितच्या या उज्ज्वल यशामागे त्याचे सातत्यपूर्ण मेहनत, निष्ठा व नियमित सराव कारणीभूत ठरला आहे. त्याला योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्ध अभ्यास आणि अंकितची चिकाटीमुळे हे यश शक्य झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

अंकित अतुल शेडगे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव तालुका स्तरावर उज्ज्वल झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, कु. शिवानी बांदल, शाळेच्या प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे, माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार व पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांनी अंकितचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

सर्व मान्यवरांनी अंकितच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तसेच भविष्यातील उज्ज्वल यशासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून शाळेतील विद्यार्थ्यांना खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

 

You may have missed