सूस :
पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील बालेवाडी, बाणेर, म्हाळुंगे, सुस, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी परिसरात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या अधिकृत उमेदवार संदीप धारुजी बालवडकर यांच्या प्रचाराचा जंगी शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेना उपनेते तथा पुणे जिल्हा संपर्क प्रमुख मा. श्री. सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
प्रचार शुभारंभानंतर काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांनी आणि नागरिकांच्या सहभागाने संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख कारभाराच्या मुद्द्यांवर आधारित प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी बोलताना मा. श्री. सचिन अहिर यांनी संदीप बालवडकर यांच्या सामाजिक कार्याचा आणि प्रभागातील जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा उल्लेख करत, ते प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.
संदीप बालवडकर यांना प्रभागातील विविध भागांतून नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून, जनतेचा विश्वास आणि सहभाग पाहता प्रभाग क्रमांक ९ मध्ये सकारात्मक आणि परिवर्तनाचे वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी