पुणे :
औंध–बोपोडी परिसरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तसेच सुखाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी माननीय अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशावेळी प्रतिष जाधव, मन्सूर शेख, अजय शेख, पृथ्वी दगडे, मंदार धायगुडे, सुनील गायकवाड, रुपेश ओव्हाळ, आकाश आढाव, शुभम कांबळे, मिलिंद लांडगे तसेच अनेक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुखाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून अविनाश कांबळे यांनी औंध–बोपोडी व पोपटी परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांवर सातत्याने प्रभावी काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा थेट संवाद व दांडगा जनसंपर्क असल्याने परिसरात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. याचा फायदा सध्या सुरू असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना होणार आहे.
अविनाश कांबळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आगामी काळात त्यांच्या अनुभवाचा व सामाजिक कार्याचा पक्षवाढीसाठी निश्चितच लाभ होईल, असेही मत व्यक्त करण्यात आले.





























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम