September 19, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

शिवम सुतार मित्रपरिवार आणि शिवसेना विभाग प्रमुख संतोष तोंडे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश, प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली..

सुतारवाडी :

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ नामदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत प्रभाग क्रमांक ९ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे–कोकाटे (अ गट), बाबुराव चांदेरे (ब गट), पार्वती निम्हण (क गट) आणि अमोल बालवडकर (ड गट) यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या वेळी उमेदवारांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी सुतारवाडी येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोथरूड विधानसभा विभाग प्रमुख संतोष तोंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे.

तसेच सुतारवाडी परिसरातील शिवम सुतार मित्र परिवारातील अनेक युवकांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाच्या वाढीस हातभार लावला. युवकांचा वाढता सहभाग आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

 

You may have missed