सूस :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, प्रभाग क्रमांक ९ चा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमात विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणा आणि जल्लोषाच्या वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे उमेदवार श्री. जीवन चाकणकर यांनी विकास, पारदर्शकता आणि लोकहिताचा ठाम संकल्प व्यक्त केला. जनतेच्या विश्वासावर परिवर्तनाची नवी वाटचाल सुरू करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरी समस्या सोडविणे, तसेच सर्वसमावेशक विकास हेच आपल्या प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या सहभागातून आणि पाठिंब्यातून प्रभाग क्रमांक ९ मध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी