महाळुंगे :
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवार गणेश कळमकर आणि लहू बालवडकर यांनी आज सकाळी महाळुंगे येथील बालेवाडी स्टेडियम परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी आणि ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधला.
ताज्या व प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या भेटीदरम्यान नागरिकांच्या अनुभवांची, दैनंदिन समस्या, जीवनगप्पा आणि विकासाबाबतच्या अपेक्षांची मनमोकळी चर्चा झाली. या संवादामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
यावेळी उपस्थित नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपा पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याबद्दल गणेश कळमकर व लहू बालवडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
उमेदवारांनी याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख धोरणांचा उल्लेख करत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ या चिन्हावर मतदान करून भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
या सकाळच्या संवादातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग पाहायला मिळाला, ज्यामुळे निवडणूक प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!