पाषाण :
“प्रमोद अण्णा आगे बढो… आता विरोधकांची शिट्टी वाजणार!” या गर्जनात्मक घोषणांच्या गजरात अपक्ष उमेदवार प्रमोद अण्णा निम्हण यांच्या निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी नाकारली गेल्यानंतरही, स्थानिक नागरिकांच्या आग्रहाने अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले प्रमोद अण्णा निम्हण आज जनतेच्या विश्वासाचे खरे नेतृत्व ठरत आहेत. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली.
पाषाण गावात महिला भगिनींनी औक्षण करून त्यांना विजयाची ग्वाही दिली. या प्रसंगी पाषाण, बाणेर आणि बालेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मिळालेला पाठिंबा पाहता वातावरण पूर्णतः उत्साहपूर्ण झाले होते.
एकनिष्ठपणे काम करूनही झालेल्या अन्यायाला आता जनतेच्या ताकदीने उत्तर दिले जाईल, अशी भावना उपस्थितांमध्ये दिसून आली. “आता विकासाची शिट्टी वाजणार!” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रमोद अण्णा निम्हण यांना विजयी करून विकासाचा नवा अध्याय लिहूया, असा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी