बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रभाग क्रमांक ९ (ब) चे उमेदवार गणेश ज्ञानोबा कळमकर यांनी प्रचाराचा भाग म्हणून प्रभागातील कुणाल ऍस्पिरी सोसायटी येथे जनसंवाद दौरा आयोजित केला. या दौर्यात त्यांनी नागरिकांशी घरोघरी भेटी देत थेट संवाद साधला.
यावेळी नागरिकांनी परिसरातील विविध समस्या, अपेक्षा व सूचना उमेदवारांसमोर मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा व नागरी सुविधांबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या मुद्द्यांकडे गणेश कळमकर यांनी लक्षपूर्वक ऐकून घेण्याचे आश्वासन दिले. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या जनसंवाद दौर्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी व्यक्त केलेला आपुलकीचा प्रतिसाद आणि विश्वास हा आगामी निवडणुकीतील पुढील वाटचालीस दिशा देणारा असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी