बालेवाडी :
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील बालेवाडी परिसरात भाजपाचे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर यांनी साई सिलीकॉन, संस्कृती व ब्लीस एव्हेन्यू या सोसायट्यांमधील नागरिकांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाची स्पष्ट दिशा आणि विश्वासाची भक्कम नाळ जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या भेटीदरम्यान नागरिकांशी मनमोकळा व संवादपूर्ण विचारविनिमय झाला. परिसरातील नागरी समस्या, विकासकामे, मूलभूत सुविधा तसेच भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
साई सिलीकॉन, संस्कृती व ब्लीस एव्हेन्यू सोसायटीतील फ्लॅटधारकांनी उमेदवार लहू बालवडकर यांच्यावर भरभरून प्रेम, विश्वास आणि शुभेच्छांचा वर्षाव करत निवडणुकीत जाहीर पाठिंबा दर्शविला. नागरिकांनी व्यक्त केलेल्या या विश्वासास पूर्ण न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि सातत्याने काम करण्याचा शब्द उमेदवारांकडून देण्यात आला.
जनतेचा विश्वास, नागरिकांचे सहकार्य, भक्कम पाठबळ आणि सक्रिय सहभाग यांच्या जोरावर प्रभाग क्रमांक ९ चा सर्वांगीण, नियोजित व विकासाभिमुख प्रवास निश्चितच साध्य केला जाईल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी माजी नगरसेविका ज्योती कळमकर तसेच युवा नेते शिवम बालवडकर उपस्थित होते.



More Stories
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा