बाणेर :
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरबाणेर येथे प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार जयेश मुरकुटे यांना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी आवर्जून भेट दिली.
या भेटीदरम्यान खासदार लंके यांनी जयेश मुरकुटे यांना प्रोत्साहन देताना, “तू काळजी करू नकोस, मी आहे. साहेबांचा निरोप सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे,” असे सांगून त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर घातली. त्यांच्या या शब्दांनी उमेदवारासह उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद कसा साधावा, प्रचाराची दिशा आणि कार्यपद्धती कशी असावी, याबाबत खासदार लंके यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांनी संघटितपणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याचे आवाहन करत त्यांचा उत्साह वाढविला.
यावेळी प्रतिक्रिया देताना जयेश मुरकुटे म्हणाले, “आमचे नेते खासदार निलेश लंके यांनी माझ्या जनसंपर्क कार्याला आवर्जून भेट देऊन मला व माझ्या कार्यकर्त्यांना मोठे बळ दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून, येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून मी अधिक जोमाने प्रचार करणार आहे. नागरिकांच्या आशीर्वादाने ही निवडणूक निश्चितपणे जिंकून येऊ, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
खासदार निलेश लंके यांच्या या भेटीमुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.





























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम