बाणेर :
काल बाणेर येथील माऊली गार्डन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, माजी खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार जयेश संजय मुरकुटे यांच्या परिवर्तन स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा नागरिकांच्या मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
या प्रसंगी बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस व महाळुंगे परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जयेश मुरकुटे यांना प्रचंड पाठिंबा देत परिवर्तनासाठी तरुण, सुशिक्षित आणि सक्षम उमेदवार निवडण्याचा निर्धार व्यक्त केला.
मेळाव्यात बोलताना वंदनाताई चव्हाण यांनी तरुण नेतृत्वाला संधी देण्याचे महत्त्व अधोरेखित करत जयेश मुरकुटे यांच्या कार्याचा गौरव केला. प्रभागातील विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित नागरिकांनी जयेश मुरकुटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा आणि येणाऱ्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्याच्या शेवटी जयेश मुरकुटे यांनी उपस्थित सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी