बाणेर :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील साहिल सेनेरी सोसायटी येथे आज उमेदवारांनी भेट देत नागरिकांशी थेट, उत्स्फूर्त आणि मनमोकळा संवाद साधला. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांनी विकासकामे, नागरी सुविधा आणि समाजोपयोगी उपक्रमांबाबत आपली मते मांडत सकारात्मक प्रतिसाद दिला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण आणि श्री. अमोल बालवडकर यांनी नागरिकांना संबोधित करत, येणाऱ्या निवडणुकीत चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
सोसायटीतील नागरिकांनीही आत्मविश्वासाने आपला पाठिंबा जाहीर करत सांगितले की, “प्रभागात आतापर्यंत झालेली विकासकामे आणि तुमच्या माध्यमातून राबविण्यात आलेले विविध उपक्रम पाहता आमचा पाठिंबा कायम तुमच्यासोबत राहील.” नागरिकांकडून मिळालेला हा प्रामाणिक प्रतिसाद उमेदवारांनी केलेल्या कामांची पोच जनतेपर्यंत झाल्याचे स्पष्टपणे दर्शवतो.
नागरिकांच्या प्रेमळ स्वागतामुळे आणि विश्वासपूर्ण प्रतिक्रियांमुळे प्रभागात केलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त होत असून, हाच विश्वास पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी देईल, असा आत्मविश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी