February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल शाळेची मान उंचावली : आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये पेरीविंकल च्या सूस शाखेतील श्रुती भोगीलचा सन्मान!!!!

सूस येथील पेरीविंकल ची गवसणी थेट आंतरराष्ट्रीय फेस्टिवलला. !!!!

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल येथील सूस शाखेच्या श्रुती भोगीलने जिंकली रसिकांची मने! पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सूस शाखेतील श्रुती भोगील या विद्यार्थिनीचे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये प्रभावी काव्य सादरीकरण केले.
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथील सूस शाखेच्या
इयत्ता आठवीच्या श्रुती भोगील या विद्यार्थिनीचे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये प्रभावी काव्य सादरीकरण करण्यात आले.

देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथे आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत २ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला चार दिवसीय भव्य दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल पुणे २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. फुलेप्रेमी संविधान दूत विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या फेस्टिव्हलला देशातील किमान दहा राज्यांतील तसेच परदेशातील शेकडो फुलेप्रेमी कवी-कवयित्रींची उपस्थिती लाभली.

२ जानेवारी रोजी भारतीय संविधानाला अभिवादन करत अत्यंत भव्य, दिव्य आणि नयनरम्य उद्घाटन सोहळ्याने फेस्टिव्हलची सुरुवात झाली. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एकाच रंगाच्या साडीत सावित्रीआई फुले यांच्या वेशात शेकडो कवयित्रींच्या उपस्थितीत जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या दृश्याने उपस्थितांचे डोळे अक्षरशः भरून आले.

चारही दिवस सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत काव्य महोत्सवाची विविध सत्रे पार पडली. दररोज किमान दहा लॉट्समध्ये शंभरहून अधिक कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांसाठी एकपात्री प्रयोग, नाट्यछटा, सांगितीक पोवाडे, फुले दांपत्याच्या जीवनावर व भारतीय संविधानावर आधारित गीतांवरील नृत्य सादरीकरण तसेच महिला सक्षमीकरणासाठी लाठी-काठी, तलवारबाजी व दांडपट्टा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय संविधान दूत पुरस्कार वितरण सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला.
या भव्य फेस्टिव्हलमध्ये चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथील सुस शाखेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी श्रुती भोगील हिने प्रभावी काव्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सावित्रीबाई फुले यांचे विचार, स्त्रीशिक्षणाचे महत्त्व आणि संविधानिक मूल्ये यांचे प्रभावी दर्शन तिच्या काव्यातून घडले.

तिच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलतर्फे श्रुती भोगील हिला सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भारताचे संविधान तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान शालेय रायटिंग पॅड प्रदान करून गौरविण्यात आले. तिला कविता लेखन व सादरीकरणाचे मार्गदर्शन मराठी शिक्षिका सौ. मिना खडतरे यांनी केले होते.

फेस्टिव्हलचे खास आकर्षण म्हणून सावित्रीआई जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या २०० कवयित्रींना सावित्रीआईंच्या वेशभूषेसाठी साडी/लुगडे भेट देण्यात आले. तसेच १००० संविधान ग्रंथांचे आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये रुजावीत यासाठी १००० संविधानमय शालेय पॅडचे वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व कवी-कवयित्रींना फुले फेस्टिव्हलचे अधिकृत अध्यक्ष म्हणून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि बॅच देण्यात आले. चारही दिवस सर्वांसाठी विनामूल्य चहा, नाष्टा व पोटभर दर्जेदार जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

या यशामागे संस्थेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, पर्यवेक्षक सचिन खोडके, स्मिता श्रीवास्तव आणि नेहा माळवदे आणि मराठी शिक्षिका मीना खडतरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे नमूद करण्यात आले.
तसेच श्रुती भोगीलच्या या यशामुळे पेरिविंकल शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला नवा आयाम मिळाला असून, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मशाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या फुले फेस्टिव्हलमधून प्रभावीपणे घडत आहे. विचारशील, संविधाननिष्ठ आणि परिवर्तनासाठी सज्ज पिढी घडवणे हीच या फेस्टिव्हलची खरी प्रेरणा आहे असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी व्यक्त केले.