पाषाण :
“आतापर्यंत प्रामाणिकपणे मेहनत केली, आता इतिहास घडवायचा आहे,” अशा ठाम शब्दांत अपक्ष उमेदवारांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपली भूमिका मांडली. जनतेच्या अढळ विश्वासाच्या बळावर आणि सेवाभावाच्या ध्यासाने मी व पुनमताई अपक्ष जनतेचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज आयोजित निर्धार मेळाव्याला माय-बाप जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांची मोठी उपस्थिती, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेकडून मिळालेला विश्वास पाहून लढण्यासाठीचे बळ अनेक पटींनी वाढल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली.
या मेळाव्यातील एक भावनिक क्षण उपस्थितांचे लक्ष वेधून गेला. एका चिमुकलीने आपल्या खाऊसाठी साठवलेले पैसे उमेदवारांच्या हातात देत, “आण्णा, तुम्ही लढा…” असे उद्गार काढले. या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले. “हा विश्वासच आमचे खरे भांडवल आहे,” असे सांगत उमेदवारांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
“मी नेहमीच आपल्या माणसांसाठी लढत आलो आहे. आता या निर्णायक लढाईत तुमची साथ, सोबत आणि विश्वास मला हवा आहे. ही लढाई सत्तेसाठी नसून सामान्य माणसाच्या हक्कांसाठी, त्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आणि न्यायासाठी आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सर्वांगीण विकास हा आमचा ठाम अजेंडा असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास यामुळे हा प्रवास अधिक मजबूत होईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी