बालेवाडी :
गुन्हेगारांना परदेशात पळून जाण्यास मदत करणाऱ्या गुन्हेगारांचा “आका” बाजूला घेऊन बसणारे आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडून आलेले पुणे शहराचे खासदार आमचे नेते अजित दादा पवार यांना राजकारण शिकवण्याची भाषा करत असतील, तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, “सुसंस्कृत पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे. खासदारकीच्या निवडणुकीत ‘काठावर’ मिळालेल्या विजयामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील मोठा वाटा होता, हे विसरता कामा नये.”
अमोल बालवडकर यांनी खासदारांवर ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी भूमिका घेतल्याचा आरोप करत ही भूमिका योग्य नसल्याचे स्पष्ट केले. “आमचे नेते अजित दादा पवार यांच्यावर यापुढे कुणीही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास, त्याला जसाच तसे उत्तर दिले जाईल,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार असलेल्या अमोल बालवडकर यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी