पाषाण :
भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलचे सरचिटणीस सचिन दळवी यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी सचिन दळवी यांना प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून इच्छुक असूनही भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली. या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी व्यक्त होत असून, सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, सुस व महाळुंगे परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर सौ. लक्ष्मी दळवी यांनी अपक्ष महिला उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सौ. लक्ष्मी दळवी यांनी कोणतेही राजकीय पाठबळ नसताना केवळ नागरिक व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजप पक्षवाढीसाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
तथापि, इतक्या प्रदीर्घ काळातील कामगिरीची दखल न घेता निष्क्रिय उमेदवार देण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “सर्वसामान्य नागरिकांचा सेवक म्हणून काम करणाऱ्या आणि पक्षासाठी अतोनात मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्याला संधी न दिल्याने भाजपने स्वतःच पायावर धोंडा मारून घेतला आहे,” अशी चर्चा पाषाण परिसरात सुरू आहे.
या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, सौ. लक्ष्मी सचिन दळवी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस वाढणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!