पाषाण :
पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रमोद निम्हण यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ पाषाण, सोमेश्वरवाडी व सुतारवाडी परिसरातील व्यापारी व नागरिकांनी आज कडकडीत बंद पाळला. सकाळपासूनच या परिसरातील बहुतांश दुकाने, आस्थापना व व्यावसायिक गाळे बंद ठेवण्यात आले होते. परंतू माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांना समजताच त्यांनी नागरिकांना आणि व्यापाऱ्याना नुकसान होऊ नये त्रास होऊ नये म्हणून त्वरित दुकाने चालू करा असे आवाहन केले.
माजी नगरसेवक प्रमोद निम्हण हे गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सामाजिक, शैक्षणिक व विकासकामांत सक्रिय असून स्थानिक नागरिकांमध्ये त्यांचा मोठा जनाधार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रमोद निम्हण यांना इच्छुक असलेल्या ओबीसी वर्गातून उमेदवारी न देता माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांना उमेदवारी दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या निर्णयाच्या विरोधात व्यापारी संघटना, स्थानिक व्यावसायिक व नागरिकांनी एकत्र येत शांततामय मार्गाने निषेध व्यक्त केला. “लोकप्रिय व कार्यकर्तृत्व असलेल्या नेत्याला डावलणे अन्यायकारक आहे,” अशी भावना बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
बंद दरम्यान परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू होती, मात्र दैनंदिन व्यवहार पूर्णतः ठप्प झाले होते. नागरिकांनी कोणताही अनुचित प्रकार न घडवता शांततेत बंद पाळत आपला रोष नोंदवला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी