पाषाण :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील पाषाण परिसरात मोठी राजकीय बंडखोरी उघडकीस आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर सरचिटणीस रोहन कोकाटे यांनी आपल्या पत्नी ऐश्वर्या रोहन कोकाटे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपाच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
रोहन कोकाटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाच्या संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका बजावत पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. युवक संघटन, नागरिकांचे प्रश्न, स्थानिक विकासकामे यामध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय असतानाही पक्षाने त्यांच्या कार्याची अपेक्षित दखल न घेतल्याने त्यांनी अखेर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
नेहमी जनसामान्यात वावरणारा, सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क ठेवणारा नेता म्हणून रोहन कोकाटे यांची ओळख आहे. पाषाण परिसरात त्यांचा मजबूत जनसंपर्क असून स्थानिक नागरिकांमध्येही त्यांच्याबद्दल सकारात्मक मत आहे. त्यामुळे ऐश्वर्या रोहन कोकाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या बंडखोरीमुळे भाजपाच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता असून आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे. एकंदरच, पाषाण परिसरात सुरू झालेली ही घडामोड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी