बालेवाडी :
वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू व निराधार नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या वतीने “मायेची ऊब” या नावाने ब्लँकेट वाटप अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. हे अभियान दिनांक २० डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत विविध भागांमध्ये पार पडले.
या सामाजिक उपक्रमांतर्गत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहर व परिसरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत सुमारे ६० ब्लँकेट्स गरजू नागरिकांना वितरित केली. रस्त्यावर राहणारे नागरिक, वृद्ध व्यक्ती, मजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या उपक्रमाचा विशेष लाभ झाला.
ब्लँकेट वाटप करताना फाउंडेशनच्या सदस्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला. या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसांत अनेकांना उब व मानसिक आधार मिळाला.
राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवून समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी