बाणेर :
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या बालेवाडी, बाणेर, म्हाळुंगे, सुस, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी परिसरातील बालेवाडी येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने संदीप धारुजी बालवडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक, युवक, महिला आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचा उत्साह, घोषणांचा गजर आणि परिवर्तनाची सकारात्मक ऊर्जा यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
यावेळी बोलताना संदीप धारुजी बालवडकर यांनी विकासाभिमुख धोरण, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची भूमिका स्पष्ट केली. “ही लढाई सत्तेसाठी नसून जनतेच्या विश्वासासाठी आहे. नागरिकांचा मिळणारा पाठिंबा हा परिवर्तनाचा संदेश देणारा असून या विश्वासावर निश्चितच विजय मिळेल,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी