औंध:
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग क्रमांक ९ (अ)मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाषाण–सुतारवाडी गावची कन्या तसेच सून असा दुहेरी संगम साधणाऱ्या गायत्री मोहन मेढे (कोकाटे) यांना अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या गायत्री मेढे यांच्या उमेदवारीने परिसरात सकारात्मक आणि सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कै. निलेश पांडुरंग कोकाटे यांच्या पत्नी असलेल्या गायत्री मेढे या सामाजिक कार्यकर्ते मोहन मेढे यांच्या कन्या असून त्यांचे पती कै.निलेश कोकाटे सामाजिक जीवनात सर्वांशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्त्व होते. पतीच्या निधनानंतर खंबीर पणे आपला परीवार सांभाळत असून नागरिकांचे स्थानिक प्रश्न, महिला सक्षमीकरण, युवकांच्या समस्यासोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
या उमेदवारीच्या घोषणेनंतर पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, सूस आणि महाळुंगे परिसरात नागरिकांमध्ये सहानुभूती व अपेक्षांचे वातावरण दिसून येत आहे. परिसरातील नागरिक, स्थानिक कार्यकर्ते व पक्ष पदाधिकाऱ्यांनी गायत्री मेढे यांच्या उमेदवारीचे स्वागत करत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी