August 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलची देवांशी निखिल मुरकुटे प्रथम क्रमांकाची मानकरी

पिरंगुट :

स्मार्ट किड अबॅकस लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजित १५ वी राष्ट्रीय व ८ वी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा (सन २०२५–२६) अलीकडे मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट येथील विद्यार्थिनी कु. देवांशी निखिल मुरकुटे हिने उल्लेखनीय कामगिरी करत रनर-अप लेव्हलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल तिला प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह (ट्रॉफी) प्रदान करण्यात आले.

 

देवांशी हिच्या या उज्ज्वल यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासावरील निष्ठा व नियमित सराव कारणीभूत ठरला आहे. तिला अबॅकस प्रशिक्षणासाठी शाळेतील अबॅकस प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्ध अभ्यास आणि देवांशी हिच्या चिकाटीमुळे हे यश शक्य झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

देवांशी निखिल मुरकुटे हिच्या या उल्लेखनीय यशामुळे पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, कु. शिवानी बांदल, शाळेच्या प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे, माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार व पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांनी देवांशीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

सर्व मान्यवरांनी देवांशीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तसेच भविष्यातील उज्ज्वल यशासाठी तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

 

You may have missed