औंध :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्यदक्ष व युवक नेतृत्व जयेश मुरकुटे यांनी आज पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ मधून ओबीसी पुरुष विभागात आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला.
यावेळी त्यांचे मार्गदर्शक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक बापू मुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अर्ज दाखल करताना पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ९ मधील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, युवकांसाठी संधी, महिलांचे सक्षमीकरण आणि मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याचा संकल्प जयेश मुरकुटे यांनी व्यक्त केला. “प्रभागात परिवर्तन घडवून आणणे, पारदर्शक प्रशासन देणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
युवा, कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून जयेश मुरकुटे यांच्याकडे पाहिले जात असून त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणे अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी