औंध :
प्रभाग क्रमांक ९ साठी इच्छुक उमेदवार लक्ष्मी सचिन दळवी यांनी आज औंध–बाणेर क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. यावेळी त्यांनी प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि गरजांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची ठाम भूमिका मांडली.
उमेदवारी अर्ज दाखल करताना बोलताना दळवी म्हणाल्या की, प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच महिलांसाठी व युवकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवणे हे त्यांच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे. “प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकून, त्यांना न्याय देणारे आणि विकासाभिमुख काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या नव्या प्रवासाची सुरुवात ही प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या संकल्पनेतून केली असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी