बाणेर :
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस व महाळुंगे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी व्यापक नागरिक संवाद साधला.
या संवादाच्या माध्यमातून जयेश मुरकुटे यांनी परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, वाहतूक, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, युवक व महिलांचे प्रश्न यांसह विविध नागरी समस्या थेट नागरिकांकडून जाणून घेतल्या. प्रत्येक प्रश्न ऐकून घेत त्यावर ठोस उपाययोजना आणि योग्य दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
यावेळी नागरिकांनी जयेश मुरकुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, “जयेश मुरकुटे यांच्यासारखा सुशिक्षित, अभ्यासू आणि तरुण नेतृत्व जेव्हा नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे झटते, योग्य मार्गदर्शन करते, तेव्हा प्रभागात निश्चितच १०० टक्के परिवर्तन घडेल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधणारे, जनतेच्या प्रश्नांशी जोडलेले नेतृत्व म्हणून जयेश मुरकुटे यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे या संवादातून स्पष्ट झाले. आगामी महापालिका निवडणुकीत हे परिवर्तन अभियान निर्णायक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!