बालेवाडी :
बालेवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपा इच्छुक उमेदवार प्रियांका विनायक चिव्हे यांनी आज घरोघरी भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या जनसंवादादरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच सुरक्षा यासंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या.
नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांना शांतपणे ऐकून घेत प्रियांका चिव्हे यांनी आपल्या ध्येय-धोरणांची आणि विकासात्मक दृष्टीकोनाची माहिती दिली. स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून विकास साधण्याचा आपला संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. थेट संवादामुळे नागरिकांनीही आपले मत, अपेक्षा आणि सूचना खुलेपणाने मांडल्या. बालेवाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रियांका चिव्हे यांनी यावेळी स्पष्ट केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी