बाणेर :
कोरोना काळानंतर प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शहरातील अनेक भागांत पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली होती. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिकेत मुरकुटे यांनी ठाम आणि आक्रमक भूमिका घेत निवेदन सादर केले होते.
“तिळगूळ घ्या, पण पार्किंगला जागा द्या” अशा उपरोधिक पण ठोस मागणीद्वारे त्यांनी प्रशासनावर दबाव टाकत नागरिकांच्या दैनंदिन अडचणी मांडल्या. पार्किंगअभावी व्यापारी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले असताना मनसे नेते अनिकेत मुरकुटे यांनी पुढाकार घेत या समस्येच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेणारे मनसे नेते म्हणून अनिकेत मुरकुटे यांची ओळख निर्माण झाली आहे. नागरिकांच्या हितासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या या नेतृत्वाला प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी अखंड कार्यरत राहणारे मनसेचे प्रभावी नेतृत्व म्हणून अनिकेत मुरकुटे प्रभाग क्रमांक ९ मध्ये अविरत परिश्रम घेत असून, त्यांच्या कामकाजामुळे ते नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी