पाषाण :
महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर पाषाण परिसरात कोकाटे परिवाराच्या वतीने कौटुंबिक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परिवारातील युवा बंधूंशी सविस्तर संवाद साधण्यात आला.
पाषाण परिसरातील युवा नेतृत्व म्हणून कार्यरत असलेले रोहन कोकाटे व ऐश्वर्या कोकाटे यांना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी बळ देण्याच्या उद्देशाने कोकाटे परिवारातील तरुण वर्ग एकत्र आला. बैठकीदरम्यान स्थानिक विकास, युवकांच्या भूमिका तसेच निवडणुकीतील सहभाग याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी उपस्थित सर्व युवा बंधूंनी पूर्ण शक्तिनिशी रोहन कोकाटे व ऐश्वर्या कोकाटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. आगामी निवडणुकीत युवकांच्या एकजुटीच्या जोरावर प्रभावी कामगिरी करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी