बाणेर :
बाणेर परिसरात पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांबद्दल सोसायटीमधील नागरिकांच्या वतीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिव समर्थ गार्डन कट्टा या नव्या मैदानाचे लोकार्पण माझ्यासह पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, अर्चना मामी धनकुडे, राखी ताई श्रीराव, शशिभाऊ बालवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या नव्याने विकसित करण्यात आलेल्या मैदानामुळे परिसरातील लहान मुलांना विविध मैदानी खेळांसाठी एक सुरक्षित व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विकासकामांमुळे परिसराचा सर्वांगीण विकास होत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी