महाळुंगे :
आज महाळुंगे गावात सर्वसमावेशक आणि ऐतिहासिक स्वरूपाची नागरिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
या बैठकीस गावातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्थानिक नेते, माजी सरपंच, उपसरपंच, विद्यमान व माजी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, भजनी मंडळाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, तरुण कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत महाळुंगे गाव व परिसरातील सर्व घटकांनी एकमुखाने सौ. प्रियांका विनायक चिव्हे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा ठराव केला.
उपस्थित नागरिकांनी प्रियांका चिव्हे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत, येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत महाळुंगे गावातून त्यांना ताकदीने पुढे नेण्याचा आणि विजयी करण्याचा ठाम शब्द दिला.
बैठकीदरम्यान अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करताना प्रियांका चिव्हे यांच्या सामाजिक कार्याची, जनतेशी असलेल्या थेट संवादाची तसेच महाळुंगे गावाच्या सर्वांगीण विकासाबाबत असलेल्या स्पष्ट आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिकेची प्रशंसा केली. “महाळुंगे गावाचा सर्वांगीण विकास, मूलभूत नागरी सुविधा, पायाभूत सोयी-सुविधा, महिला व तरुणांचे सक्षमीकरण तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य” या मुद्द्यांवर उपस्थितांनी एकमताने विश्वास व्यक्त केला.
या बैठकीत शेकडो नागरिकांचा सहभाग असून, विशेषतः माता-भगिनींचा उत्स्फूर्त आणि उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केल्यामुळे या बैठकीला अधिक बळ मिळाले आणि सामाजिक सहभागाचे सकारात्मक चित्र समोर आले.
एकंदरीत, आजच्या या बैठकीतून महाळुंगे गाव व परिसरातील नागरिकांचा तसेच विविध राजकीय पक्षांचा प्रियांका चिव्हे यांना मिळणारा व्यापक, जाहीर आणि भक्कम पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला.
ही बैठक आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी असून, महाळुंगे गावातील जनतेची एकजूट, विकासाभिमुख भूमिका आणि सकारात्मक राजकीय वातावरण अधोरेखित करणारी ठरली आहे.
सौ. प्रियांका विनायक चिव्हे या भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ०९ ‘अ’ मधून अनुसूचित जमाती (ST) आरक्षित जागेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीला महाळुंगे गावातून मिळालेला हा व्यापक आणि ठाम पाठिंबा आगामी निवडणूक प्रक्रियेत निर्णायक ठरेल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.



More Stories
*प्रसिद्ध डायरेक्ट सेलिंग कंपनी ‘प्रोव्हेदा इंडिया’चा ७ वा वर्धापन दिन पुण्यात दणक्यात संपन्न!*
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात, कर्मचाऱ्यांच्या दिवाळीत आनंदाची भर; बाणेर नागरी पतसंस्थेचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श
ट्रॅकवर खिळे, मैदानात दारूच्या बाटल्या म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम मधे खेळाडूंच्या स्वप्नांचा चुराडा, सराव सोडून मैदान खासगी इव्हेंट साठी उपलब्ध..