बालेवाडी :
प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या सस्नेह मेळाव्याचे यंदाचे आयोजन रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे दरवर्षी नागरिकांना एकत्र येण्याची, संवाद साधण्याची आणि आनंद साजरा करण्याची संधी मिळत असून हा कार्यक्रम नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत
बालेवाडी हाय स्ट्रीट मैदान, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक तथा पुणे शहर विकास समितीचे माजी अध्यक्ष मा. श्री. अमोल रतन बालवडकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत असून, प्रभागातील सर्व मान्यवर नागरिकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिवाळ्याच्या ऋतूमध्ये पारंपरिक हुरड्याचा आस्वाद घेत आपुलकीच्या वातावरणात सस्नेह भोजनाचा आनंद घेण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. नागरिकांच्या सन्माननीय उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी