बाणेर :
प्रभाग क्रमांक ९ मधील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उच्चशिक्षित इच्छुक उमेदवार प्रियांका विनायक चिव्हे यांना पाठिंबा देण्यासाठी बाणेर व्यापारी संघटनेच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीदरम्यान व्यापारी बांधवांनी प्रभागातील विकास, व्यापारी समस्या, पायाभूत सुविधा, वाहतूक, पार्किंग आणि स्वच्छता यासारख्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. प्रियांका चिव्हे यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख नेतृत्व देण्याचा विश्वास उपस्थितांना दिला.
या बैठकीस भाजपा इच्छुक उमेदवार, कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष श्री. लहू बालवडकर, संतोष तापकीर तसेच सरचिटणीस श्री. सचिन दळवी हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांची माहिती देत प्रभाग क्रमांक ९ च्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
बैठकीअंती बाणेर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रियांका विनायक चिव्हे यांना जाहीर पाठिंबा देत आगामी निवडणुकीत सक्रिय सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी